✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.10 फेब्रुवारी) :- स्वतंत्र भारताच्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला घटनादत्त अधिकार दिलेले आहेत .प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले असून आपले स्वतंत्र मत मांडण्याचा नैतिक अधिकार आहे व तो अधिकार कोणीही बळजबरीने हुकूमशाही पद्धतीने हिरावून घेऊ शकत नाही. लोकशाहीतील समाज माध्यमावर विविध विषयाच्या अनुषंगाने पत्रकार पोटतिडकीने आपली रोखठोक भूमिका लेखणीच्या , संवाद शैलीच्या, विविध वाहिनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्यक्रमातून सातत्याने आपली भूमिका मांडीत असतो त्या विचारांना द्वेष रागातून व हल्ला या माध्यमातून बघू नये.
विविध पुरोगामी संस्था संघटना तर्फे शुक्रवारी सायंकाळी दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारकामध्ये निखिल वागळे व अन्य वक्त्यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. नियोजित पुणे येथील साने गुरुजी स्मारकात कार्यक्रमाला चाललेले निर्भीड पत्रकार निखिल वागळे यांचे वरती समाज विद्रोही प्रवृत्तीतून त्यांच्या गाड्यावर हल्ला करण्यात आला.
झालेला हा भ्याड हल्ला एका पत्रकारावर नसून संपूर्ण लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ वर हल्ला आहे असे स्पष्ट मत सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी केले असून ,सदर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.