पंचायत समिती वरोरा येथे “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत कलश यात्रेचे आयोजन Organized Kalash Yatra under “Meri Mitti Mera Desh” campaign at Panchayat Samiti warora

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.17 ऑगस्ट) :- आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश ” अभियान पंचायत समिती वरोरा येथे राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार प्रत्येक राज्यांमध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेणे अपेक्षित आहे.

या अभियानांतर्गत पंचायत समिती वरोरा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शीलाफलक उभारण्यात आले. गावातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली तसेच गावातील माती मातीच्या कलशामध्ये गोळा करून तो कलश पंचायत समितीला जमा करण्याबाबत नियोजन होते. 

            पंचायत समिती वरोरा चे गटविकास अधिकारी श्री.संदीप गोडशलवार यांच्या संकल्पनेतून स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव अंतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश ” च्या औचित्यावर कलश यात्रा काढून तालुक्यातील 81 ग्रामपंचायतचे कलश दि. 15 ऑगस्ट ला एकाच दिवशी पंचायत समितीत जमा करण्याबाबत नियोजन होते.त्याअनुषंगाने हुतात्मा स्मारक, जाजु चौक वरोरा येथे सरंपच व सचिव यांना दु.12.00 वाजता एकत्रित व्हावे असे आवाहन करण्यात आले.

या आव्हानाला ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवांनी प्रतिसाद देत आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी हुतात्मा स्मारक वरोरा येथील शहीद श्री.योगेश डाहुले यांच्या स्मारकाला सर्व उपस्थितांनी माल्यार्पन व अभिवादन करून कलश यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी शहीद श्री.योगेश डाहुले यांची आई आणि वडील यांचा यथोचित सन्मान वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार मा.श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या सहाय्याने कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. कलश यात्रेचा समारोप पंचायत समिती सभागृह, वरोरा येथे करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती वरोरा चे गटविकास अधिकारी श्री.संदिप गोडशलवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरोरा विधानसभेचे आमदार मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन वरोरा चे उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे ,तहसीलदार श्री योगेश कौटकर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.

सदर कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक. ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कलश यात्रेचा नाविन्यपुर्ण उपक्रम पंचायत समिती वरोरा येथेच घेण्यात आल्याचे समजते.याबाबत मा.श्री. विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपुर यांनी सुद्धा उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. डाहुले यांच्या स्मारकाला सर्व उपस्थितांनी माल्यार्पन व अभिवादन करून कलश यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी शहीद श्री.योगेश डाहुले यांची आई आणि वडील यांचा यथोचित सन्मान वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार मा.श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या सहाय्याने कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. कलश यात्रेचा समारोप पंचायत समिती सभागृह, वरोरा येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती वरोरा चे गटविकास अधिकारी श्री.संदिप गोडशलवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरोरा विधानसभेचे आमदार मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन वरोरा चे उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे ,तहसीलदार श्री योगेश कौटकर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली. सदर कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक. ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कलश यात्रेचा नाविन्यपुर्ण उपक्रम पंचायत समिती वरोरा येथेच घेण्यात आल्याचे समजते.याबाबत मा.श्री. विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपुर यांनी सुद्धा उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले.