✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.3 मे ) :- बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अंतर्गत शैक्षणिक सत्र 2022 -23 मद्ये पर्यावरण पूरक उपक्रम करीता ताडोबा बफर झोन मधील निवडक 50 शाळेची निवड करण्यात आलेली होती. शाळेमधून वर्ग 9 वी मधील दोन विद्यार्थी (1 मुलगा व मुलगी) पर्यावरण दुत म्हणून तर वर्ग शिक्षकाची पर्यावरण शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. मा.श्री. संजय करकरे साह्ययक संचालक,सौ.संपदा करकरे शिक्षणाधिकारी,
सौरभ दंदे, अमेय परांजपे, जगदीश धारणे, चरणदास शेंडे, महेश मोहूर्ले या सर्व बी.एच.एन.एस. संस्थे अंतर्गत 50 शाळेत जाऊन पर्यावरण पूरक विविध उपक्रमाची माहिती दिली.
त्यांच्या मार्गर्शनाखालीच सर्व शाळेने आपल्या कल्पकतेने विविध उपक्रम राबवून गावकरी मंडळी,विद्यार्थी,शिक्षक, पालक यांना वन्य प्राणी व मानव संरक्षण बद्दल जागृती निर्माण करण्याचे कार्य पूर्ण केले. जी शाळा उत्तम कार्य केले त्यांचे उत्कृष्ट निसर्ग शाळा म्हणून निवड करण्यात आली. मूल्यांकन केल्या नंतर नेहरू विद्यालय शेगाव बूज शाळेचा उत्कृष्ट निसर्ग शाळा म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नंदकिशोर काळे साहेब (उप विभागीय अधिकारी ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कोअर झोन) यांचे हस्ते पर्यावरण शिक्षक श्री. नरेन्द्र कन्नाके, पर्यावरण दुत भाग्यवान डूमरे, कु. श्रृती बावणे यांना प्रमाणपत्र, तीन हजार रोख रक्कम व शिक्षक व विद्यार्थी यांना पर्यावरण पूरक पुस्तक प्रदान करण्यात आले. सौ. संपदा करकरे मॅडम यांनी वर्षभर झालेल्या उपक्रम बदल थोडक्यात माहिती दिली.
श्री. संजय करकरे सर यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थे बद्दलची माहिती सोबतच शाळा व विद्यार्थी यांची निवड कशी झाली त्याबद्दल आपले मनोगत स्पष्ट केले. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचे राबविलेल्या विविध उपक्रमा बद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले. मा. नंदकिशोर काळे साहेब यांनी अध्यक्ष भाषणात वन्य प्राण्यांच्या बाबतीत जागृती निर्माण करण्यासाठी जे उपक्रम राबविले या बद्दल सर्वांचे कौतुक केले. या पुढेही आपण असेच सहकार्य अपेक्षित आहे असे आव्हान केले.
श्री. सौरभ दंदे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.नेहरू विद्यालय शेगाव बूज शाळेला उत्कृष्ट निसर्ग शाळा चा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. बालाजी ढाकुणकर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक :- मनोज गाठले 9767883091