✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.31 ऑगस्ट) :- भारतात रक्षा बंधन श्रावण महिन्यात येतो. हा सण प्रेमाचा प्रतीक म्हणून प्रचलित आहे. विद्यार्थां मद्ये बंधुभाव, आपुलकी , जिव्हाळा निर्माण व्हावे तसेच या उत्सावाचे महत्व विद्यार्थांना कळावे.
याकरिता 31 आगष्ट 2023 ला नेहरू विद्यालय शेगाव बूज येथे रक्षा बंधन उत्सव साजरा करण्यात आला. शाळेतील ( विद्यार्थी) मुली मुलांना राखी बांधून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यामुळे कुणाला बहीण किंवा भाऊ नसेल तरी आज सर्वांना राखी बांधून एक वेगळा उपक्रम राबविण्यात आले. यामुळे आपली संस्कृती टिकून चिरकाल टिकून राहणार आहे.यामुळे नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख म्हणून मुख्याध्यापक बी.जी. ढाकुणकर , एन.जी. कन्नाके, एस.एस. शंभरकर, ए.सी. मानकर, व्ही.एन मत्ते,सौ. हीवरकर, सौ. वरभे, सौ.आसुटकर , श्री लांजेवार, गिरडे सर, उरकडे सर व शिक्षक,इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.