नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन साजरा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.7 सप्टेंबर) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे 5 सप्टेंबर हा दिवस डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन याचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यात शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासनाद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक व शिपाई म्हणून विद्यार्थ्यांनी कार्य पार पाडले. नंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ढाकुणकर सर, प्रमुख पाहुणे, एक दिवसाचे मुख्याध्यापक कु. सिद्धी डोंगरे, जेष्ठ शिक्षक शंभरकर सर, वरभे मॅडम, चांगले सर, कन्नाके सर हे होते. संचालन कु किरण चौधरी आभार कु पुणम झाडे. उत्तम शिकविणा-या दिनाच्या शिक्षकांचा गुण गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मंचारी व विद्यार्थी उपस्थित होते.