✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क )
चंद्रपूर(दि.10 मार्च) :- जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिंपरी येथील उपक्रमशील शिक्षक अनराज टिपले यांना सोलापूर येथे ४ व ५ मार्चला घेण्यात आलेल्या सर फाउंडेशन द्वारा दोन दिवशीय कॉन्फरन्स मध्ये स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन सोलापूर ,महाराष्ट्र यांनी नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड ने सन्मानित केले.
जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिंपरी येथील कलाशिक्षक अनराज टिपले यांच्या स्वसंमोहन व स्वयं सूचनेद्वारे व्यक्तिमत्व विकास घडविण्यास चित्रकलेचा वापर या नवोपक्रम करिता निवड करून सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२२ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानामध्ये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन अनराज टिपले यांचा गौरव करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले .या सन्मान सोहळा -पुरस्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी नामवंत संस्था सनदी अधिकारी शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी वर्ग जेष्ठ शास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ यांची उपस्थिती होती.
सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव सोलापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास डॉक्टर दीपक माळी (एम एस सीईआरटी ,पुणे) ,डॉक्टर किरण धांडे (यशदा ,पुणे), पदमश्री गिरीश प्रभुणे ,जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अरविंद नातू, प्रदीप मोरे (माजी शिक्षण उपसंचालक, पुणे) ,दत्तात्रय वारे (प्रयोगशील शिक्षक) ज्ञानदा चे प्राचार्य ह.ना. जगताप ,प्रसिद्ध शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर ,डॉक्टर सौ .सुवासिनी सशहा( प्रेसिडेंट फाउंडेशन सोलापूर) तसेच सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम मासाळे, राजकिरण चव्हाण ,मारुती शहाणे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती यात उपक्रमाचे सादरीकरण व्याख्याने परिसंवाद घेण्यात आले .
देशभरातून महाराष्ट्र, केरळ ,आंध्र प्रदेश ,हैदराबाद ,राजस्थान अशा विविध राज्यातून नवपक्रमशील शिक्षकांनी आपल्या उपक्रमाचे सादरीकरण केले यात चंद्रपूर जिल्ह्यातील कलाशिक्षक अनुराष्ट्रीय यांनी स्वसंमोहन व स्वयं समितीद्वारे व्यक्तिमत्व विकास घडविण्यात चित्रकलेचा वापर यांचे सादरीकरण केले. त्यांच्या निवडलेल्या उपक्रमास मान्यवरांच्या हस्ते इनोव्हेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाला सहकार्य करणारे जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक मा. दुर्गे सर, सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कलाशिक्षक अनुराज टिपले यांना सहकार्य लाभले .त्यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील कर्मचारी, सामाजिक स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.