नूतन पोलीस अधिकारी एपीआय प्रवीण राठोड यांचा कासार शिरशी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.19 जुलै) :- 

कासार सिरसी पोलीस स्टेशन चे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री प्रवीण राठोड यांची कासार शिरशी येथील पत्रकारांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यानिमित्य सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर, व पत्रकार चंद्रशेखर केंगार( केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पत्रकार द्रोणाचार्य कोळी आनंद कोकणे, संजू यादव (प्रेस फोटोग्राफर) आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय साधणे, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार आणि पोलीस यांचे सहकार्य असणे, पत्रकारावर होणारे खोटे गुन्हे यावर निर्बंध घालणे, लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

तसेच गुन्हेगारीवर आळा घालणे, महिलांना सुरक्षा देणे, तरुण पिढीला व्यसनमुक्त करून एम पी एस सी व यू पी एस सी या स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण राठोड यांनी सांगितले.