नीरज आत्राम,यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्काराने सन्मानित 

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.14 जानेवारी) :- राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, विसावा सोशल फाउंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात आला.

 हा पुरस्कार सोहळा कला,शिक्षण,साहित्य, समाज,उद्योग,युवक सांस्कृतिक,महिला अशा विविधांगी क्षेत्रात असामान्य वाटचाल करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विलोभनीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार भवन, गांजवे चौक,नवी पेठ,पुणे येथे संपन्न झाला.

या सोहळ्यामध्ये कवी नीरज आत्राम वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक , साहित्यिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार मान. नाम. श्री मुरलीधर (अण्णा ) मोहोळ, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय मंत्री भारत सरकार,मान. श्री, श्रीरंग बारणे खासदार,मान. श्री मेघराज राजे भोसले अभिनेते, अध्यक्ष अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ, मान. तृप्ती देसाई अध्यक्ष भूमाता ब्रिगेड, मान. श्री ध्रुव दातार अभिनेता,( लक्ष्मीची पाऊले मालिका फेम ) मान. श्री संजय कुलकर्णी ( सुपेकर ) साहित्यिक मान. शरद गोरे,

श्री प्रा.डॉ.बी.एन.खरात, श्री वेद पाठक, श्री संदीप राक्षे, स्वाती तरडे,प्रा. नितीन नाळे,श्री, विनोद देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला बहूसंख्य लोकांची उपस्थिती लाभली.

नीरज आत्राम यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.