निवडणूक आली तरी ही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही कसे होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट…शेतकरी पुत्र विनोद उमरे

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9 एप्रिल) :- लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले.निवडणूकीच्या आधी शेत पिकाची भाव वाढतील या आशेवर शेतकरी होते.परतु राजकीय नेते आणि कार्यकर्ते निवडणूकीच्या कामाला लागले.निवडणूकीच्या तारखाही देखिल निश्चित झाल्या.परंतु अजूनही कापूस, सोयाबीन, हरभरा या शेत पिकांचे भाववाढीचा प्रश्न अधांतरीतच आहे.शेतकऱ्याना मताचा जोगवा मागणारे नेते तसेच अधिकारी देखिल निवडणूकीत व्यस्त आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणी वाली नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.जिल्हात यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, पिकाची मोठ्या केली होती.त्यामुळे शेत पिकाला दर मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांना होता.शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले खरे.

मात्र दर वाढव्याऐवजी दर मोठी घसरण होत आहे.त्यामुळे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी राजा चिता अधिकच वाढली आहे. आणि दुसरीकडे राजकीय नेते प्रचारात मग्न झाले आहेत.या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी म्हटले आहे.