निर्भिड पञकार स्नेहा उत्तम मडावी यांचा सत्कार महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते

🔸मतदान विषयी जनजागृती कार्यक्रम होने गर्जेचे…निवडणुक आयुक्त महाराष्ट्र श्रीकांत देशपांडे

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.9 फेब्रुवारी) :- शेवराई सेवाभावी संस्थाच्या वतीने नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रम कै.ज्ञानदेव भोसले आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमनित्ताने पुणे जिल्ह्यातील तिन लाख पारधी व भिल समाजाला मतदान जनजागृतीवर हर घर ओटींग कार्ड घर पोच उपक्रम राबविण्यात आला. या वेळी निवडणूक आयुक्त श्रीकांतजी देशपांडे यांच्या हस्ते आदर्श माता शेवराबाई भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

या मध्ये हवेली तालुक्यातील नायगाव व ऊरुळी कांचन भोसले वस्ती ,टिळेकर वाडी खामगाव टेक , शिरुर तालुक्यातील तळेगाव ढंमडरे येथे आणि इंदापुर तालुक्यातील तक्रार वाडी येथे माननिय निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे साहेब व आदिवासी समाजसेवक लेखक नामदेव भोसले यांच्या हस्ते आदिवासी फासे पारधी व भिल समाजला ओटींग कार्ड,रेशनिंग कार्ड,जातीचा दाखले,जागा पट्टे सातबारा , उत्पन्नाचा दाखले वाटप करण्यात आले,तसे एकुन पारधी समाज व भिल समाजाला सात हजार नविन ओटींग कार्ड,तीन हजार जातिचे दाखले, चौदाशे रेशनिंग कार्ड उत्पन्नाचे दाखले व हर घर हर एक व्यक्ती ओटींग कार्ड घर पोच उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे साहेब हे आदर्श माता शेवराबाई भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये सहभागी झाले होते , त्या दौ-यानिमित्त चे औचित्य साधून या वेळी हवेली तालुक्यातील नायगाव, ऊरुळी कांचन, शिरुर, इंदापुर येथे कार्यक्रमा मध्ये मा श्रीकांत देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले, तसे माननीय श्रीकांत देशपांडे साहेब (अप्पर मुख्यसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यादांच पारधी वस्तीस गाव भेट देऊन या समाज्याचे दुःख जाणुन घेणारे पहिलेच अधिकारी आहेत.

पारधी समाजाच्या समस्या व उपाय तसेच प्रत्येक मतदानाचे महत्त्व काय आहे हे पारधी समाजास पटवून दिले व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाआकारींना व पोलीस अधीक्षक यांना काही सूचना दिल्या तसेच ज्या पारधी बांधवांना कंलकीत नजरेन पाहिले जात होते, अशा कुटुंबासाठी विशेष लक्ष देवून पारधी समाजातील जेष्ठ समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजातील तरुणांना मासेमारी व्यवसायामध्ये आणले व बोटिंग व्यवसाय, शेळी पालण, शेतीमध्ये रोजंदारी, असे व्यसाय मध्ये आणले त्या मध्ये आपली उपजीविका कशी भागवतात याची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त मा.श्रीकांत देशपांडे,जेष्ठ आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले, हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी संजय आसवले,शिरुरच्या प्रांत देवकाते मॅडम, बारामतीचे प्रांत वैभव नारवडकर,आदर्श माता शेवराबाई भोसले,            

हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे, शिरुरचे तहसिलदार. म्हेत्रे, इंदापूरचे तहसिलदार. श्रीकांत पाटील,तसेच जिल्हातील नायब तहसिलदार, मंडलअधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,आणि पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचा ही सत्कार करण्यात आले गरीब कुटुंबावर अन्याय झाला की चौकोशी करुन  न्याय मिळुन देतात घरोघरी जाऊन सरवे केले.

दीड वर्ष संस्थेमध्ये काम केले आणि अनेक पीडीत कुटुंबाला न्याय मिळुन दिले मुळचे चंद्रपूर जिल्हातील आदिवासी भागात भेंडाळा गावात राहणारी मुलगी पुणे मध्ये येउन पेपरला बातमी देऊन धडाकेबाज कारवाई करणारी स्नेहा मडावी म्हणुन अशी ओळख पुणेमध्ये व सर्व कर्मचारीचे सन्मान करण्यात आले व नायगाव ग्रामस्थ उपस्तीत,ऊरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, व ऊरुळी कांचन ग्रामस्थ, तुकाराम भोसले, राजेंद्र टिळेकर , ग्रामस्थ, सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.