निखिल बोबडे यांची शासनाच्या क्रीडा मार्गदर्शक पदी निवड  

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .28 जून) :- वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा (डब्ल्यूएसएफ) व लोक शिक्षण संस्था वरोडा चे व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री निखिल उत्तम बोबडे यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामध्ये राज्य क्रीडा मार्गदर्शक (गट ब -अराजपत्रित )म्हणून निवड झालेली आहे, निखिलने शारीरिक शिक्षण विषयक विशेष पदवी प्राप्त केली असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा मार्गदर्शक परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केल्याने त्याची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे निखिल विद्यालयीन शिक्षण लोकमान्य विद्यालयातच झाले असून सध्या ते शिक्षक म्हणून याच संस्थेत कार्यरत होते.

निखिलच्या मार्गदर्शनात लोक शिक्षण संस्था वरोडा व वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोराचे संघ राज्यस्तरावर खेळलेले असून त्याच्या मार्गदर्शनातील अनेक खेळाडूंना महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. लोक शिक्षण संस्था वरोडा व वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा खेळाडूंच्या खेळाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष देत असून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पण पूर्ण करून घेतल्या जातो त्यामुळेच खेळाडूंना शासन नोकरीत संधी मिळते. या आधी सुद्धा वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्थेचे खेळाडू शासनाचे नोकरीमध्ये लागलेले आहेत, तसेच काही खेळाडूंची निवड अभ्यासक्रमाच्या आधारे शासनाच्या नोकरीमध्ये झालेली आहे.

निखिल बोबडे यांनी आपले यशाचे श्रेय लोक शिक्षण संस्था वरोडाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्णाजी घड्याळपाटील, कार्यवाह दुष्यंतजी देशपांडे, विश्वनाथ जोशी, सुनील बांगडे, प्रवीण खीरटकर, लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय अंबुलकर तसेच वडील उत्तमरावजी बोबडे व आई स्वर्गीय शिला उत्तम बोबडे यांना सोबतच त्यांच्या वाटचालीत नेहमी सर्वतोपरी मदत करणारे मावशी-काकाजी निला प्रशांत भागवतकर, विना शंकर वैद्य यांना दिले.

निखिलच्या निवडी बद्दल वरोरा स्पोर्टस फाउंडेशन अध्यक्ष गजानन जीवतोडे, कार्याध्यक्ष किशोर पिरके, देवानंद डुकरे , मिलिंद कडवे ,विनोद उंमरे, दुष्यंत लांडगे, गणेश मुसळे, डॉ. प्रशांत खुळे व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोराच्या खेळाडूंनी अभिनंदन केले.