ना. सुधीर मुनगंटीवार यांना सर्वधर्म समभाव प्रभूसेवा संस्थेचा पाठिंबा जाहीर

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.11 नोव्हेंबर) :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर येथील सर्वधर्म समभाव प्रभूसेवा संस्थेने पाठिंबा जाहीर केला आहे. ना. श्री. मुनगंटीवार हे एक सामाजिक जाणीव जपणाने नेतृत्व असल्याचे सांगत निराधारांना आधार देणाऱ्या या संस्थेने पाठिंब्याचे पत्र जारी केले आहे.

‘आमची संस्था दिव्यांग, निर्वासित, मनोरुग्णांना निःशुल्क कटिंग-दाढी, आंघोळ, पादत्राणे, नवीन वस्त्र परिधान करुन देणे व स्वच्छ करुन देणे अशा प्रकारची सेवा देते. आमच्या संस्थेचे कार्य चंद्रपूर व बल्लारपूर भागात मोठ्या प्रमाणात आहे. या संस्थेचे पाचशेच्यावर सदस्य आहेत. आमच्या संस्थेने आपणास समर्थन देण्याचे ठरविले आहे. आम्ही आपल्याला पूर्णशक्तीने सहकार्य करू,’ असे पत्र संस्थेचे अध्यक्ष रमेश हनुमंते आणि उपाध्यक्ष अरुणभाऊ मांडवकर यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना दिले आहे.

ना. श्री. मुनगंटीवार यांना समाजाच्या विविध घटकांकडून सातत्याने समर्थन वाढत आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी पुढे येऊन ना. श्री. मुनगंटीवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे, हे विशेष.