नागपूर विभागीय नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प)गोळघाटे मॅडम यांनी केली शेतीशाळेची तपासणी Nagpur Divisional Nodal Officer (Smart Project) Golghate Madam inspected the farm school

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.11 जुलै) :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा दि.११ जुलै२०२३ ला आसाळा येथे श्री सुधाकर डुकरे यांच्या शेतात आयोजित करण्यात आली.

या प्रकल्पात समाविष्ट असलेला संघर्ष शेतकरी बचत गट मधील ४५ शेतकरी सभासद उपस्थित होते. नोडल अधिकारी विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट प्रकल्प) नागपूर श्रीमती प्रज्ञा गोळघाटे मॅडम यांनी कापुस मुल्य साखळी विकास प्रकल्प विषयी सविस्तर मार्गदर्शन करतांना गटाच्या माध्यमातून कापूस गाठी बनवून आंतरराष्ट्रीय बाजारात विकून शेतकऱ्यांनी नफा कमवावे ,असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. 

        सर्वप्रथम शेतीशाळेची सुरुवात सकाळी ८ वाजता शेतीशाळा प्रतीज्ञा घेऊन करण्यात आली. मागील वर्गातील विषयांवर मागोवा घेण्यात आला. सदर शेतीशाळेत श्री. विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी शेगांव बु. यांनी शेतीशाळेतील शेतकऱ्यांना पिक निरीक्षणे कशी घ्यायची,मित्र किटक, शत्रू किटकओळखणे,आय.पि.एम,नॉन आय.पि.एम क्षेत्र निवडणे, चित्रिकरण व सादरीकरण करणे याविषयांवर विस्तृत असे मार्गदर्शन केले.श्री. सुशांत लवटे, तालुका कृषी अधिकारी वरोरा यांनी कापूस पिक उत्पादन तंत्रज्ञान व उत्पादन खर्च कमी कसा करायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री.नंदकुमार घोडमारे ,नोडल अधिकारी स्मार्ट चंद्रपूर यांनी स्मार्ट अंतर्गत कापुस गाठी तयार करणे तसेच खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ व मुल्यवर्धन करून कापूस विक्री करण्याचे फायदे समजावून सांगितले.तसेच श्री. गौरव डेहनकर पर्यावरण तज्ञ यांनी क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर अंतर्गत वापरावयाचे दहा तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगितले व शेतात ते वापरण्याविषयी मार्गदर्शन केले.

सदर शेतीशाळेला श्री. गणेश मादेवार सर पुरवठा व मुल्य साखळी तज्ञ स्मार्ट चंद्रपूर, श्री प्रतीक भेंडे सर स्मार्ट कॉटन मुल्य साखळी तज्ञ, श्री. प्रफुल आडकीणे कृषी पर्यवेक्षक शेगाव १ , श्री रोशन डोळस कृषी सहाय्यक पाचगाव ठा.आदी उपस्थित होते.आभार प्रदर्शन कु.मिनल आसेकर बिटीएम आत्मा यांनी केले.अल्पोपहार देऊन शेतीशाळा वर्गाची सांगता करण्यात आली.