▫️सापाचे संरक्षण गरजेचे..सर्पमित्र यांचे आवाहन(Protection of the snake is necessary..Sarpamitra’s appeal)
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.21 ऑगस्ट) :- श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी या सणाच्या दिवशी नागपंचमी साजरी करत असताना नाग व वारुळाला जास्त महत्व नागरिक देत असतात नागपंचमी दिवशी महिला वाळूराची, मूर्तीची पूजा करून त्याच्यासमोर दूध ठेवत असतात, पावसाळा सुरू असून या दिवसात पावसाचे पाणी सापाच्या बिळात गेल्याने साप बाहेर निघत असतात, तर सगळीकडे शेतकरी राजा आपल्या धरती मातेच्या मशागती करून शेतीमध्ये पिकांची लागवड केली आहे, हा काळ साप व अंड्यातून त्याची पिल्ले बाहेर येण्याच्या काळ असुन त्यामुळे साप चावल्याच्या घटना जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये घडत असतात…
भारतात सुमारे 278 जातीचे साप आढळतात या जातीमध्ये आकार, रंग, लांबी, सापा वरील खुणा याचा समावेश आहे, विदर्भात सर्वात लहान वाळा साप असून हा साप पंधरा सेंटिमीटर असून सर्वात लहान साप आहे, सापामध्ये मोठा साप म्हणून अजगर हा साप सुमारे 11 मीटर लांबीचा असून मोठा साप अजगर सापाची ओळख आहे भारतात 52 विषारी साप असून सापांच्या या 52 जातीमध्ये आपल्याकडे असणारे चार विषारी साप आहे, त्यामध्ये नाग, मण्यार, पुरसे, घोणस, यांचा समावेश आहे तर निमविषारी सापामध्ये हरणटोल, इंडियन एज ईटर, मांजऱ्या,रेती सर्प, यांच्या समावेश आहे, तसेच बिनविषारी सापामध्ये अजगर,धामण, धुळनागिन, दोन तोंड्या (मांडूळ) कवड्या, रुखई, तस्कर, डुरक्या घोणस, गवत्या,ताशा, कवड्या, कुकरी,दिवड,नानेटी, काळतोंड्या, वाळा, आदी सापांच्या समावेश असून विदर्भात 30 ते 35 जातीचे सापांच्या समावेश आहे..
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकाचे नुकसान उंदीर हा दरवर्षी पंधरा ते वीस टक्के करत असतो साप हा एकमेव प्राणी उंदराच्या बिड्यामध्ये जाऊन उंदराला मारत असतो व शेतकऱ्यांच्या पिकाचे होणार नुकसान कमी करतो, शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान,कपास, सोयाबीन, तूर पिके असून शेतामध्ये जाताना पावसाळ्या दिवसांमध्ये नागरिकांनी सुरक्षा म्हणून शेतात काम करताना,शेतावर जातांना हातामध्ये एक घुंगरू बांधलेली काठी, पायामध्ये मोठे बूट घालून शेतामध्ये जावे तसेच जनावरांचा, कोट्यातून तणीस,कुटार,कडबा डिगऱ्यातून काढताना आकुडीचा वापर करून काढावे व जनावराला चारा टाकावे,तसेच आपल्या घराशेजारी साफसफाई ठेवणे, रात्री झोपते वेळी जमिनीवर झोपणे टाळावे त्यामुळे सापा पासून बचाव होऊ शकतो..
एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करावे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सापाचे इंजेक्शन उपलब्ध असून मंदिरात किंवा मात्रीकाकडे न जाता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपयोग करावा, तसेच साप दिसल्यास वनविभाग, सर्पमित्र यांना संपर्क करून आपले व सापाच्या सुद्धा जीव वाचवावे.