नवोदय विद्यालय परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवा

🔹ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख संपल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

🔸विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.22 फेब्रुवारी) :-नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सत्र २०२२- २३ परीक्षा करिता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होताच संपूर्ण विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेण्याकरिता आवेदन पत्र सादर केले . परंतु नवोदय विद्यालय परीक्षेचे अर्ज आवेदन पत्र हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्याने यात काही विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरून प्रवेश केलेत . परंतु तांत्रिक अडचणी मुळे शिवाय संगणकाचे सतत सर्वर डाऊन , नेट प्रॉब्लेम मुळे अनेक विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र सादर झाले नाहीत . त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थांना या परीक्षे पासून वंचित राहावे लागले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थीचे शैक्षणिक बौध्दिक नुकसान झाले असल्याने अनेक विद्यार्थ्यामध्ये , पालकांमध्ये , नाराजीचे सूर पसरले आहे. 

      विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षेची पूर्व तयारी करीत असून या साठी त्यांनी अथक परिश्रम घेतले . परंतु या ऑनलाईन प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बौध्दिक क्षमता असलेले प्रात्याक्षिक जणते समोर मांडता आले नाही . 

         तेव्हा किमान गोर गरीब जनतेचा तसेच गरीब विद्यार्थ्याचा विचार लक्षात घेऊन . त्यांना ही उंच भरारी घेण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात यावा करिता नवोदय विद्यालय परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी तसेच शिक्षक पालक वर्ग करीत आहे तेव्हा या गंभीर समस्या कडे संबंधित शिक्षण विभागाने याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे .. 

     या गंभीर समस्या चे विशेष उदाहरण द्यायचे झाले तर नागालँड राज्यामध्ये याची मुदत वाढ देण्यात आली असून येथील विद्यार्थी आज ही आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज करीत आहे परंतु . अति दूर्गम समाझल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण पासून तसेच स्पर्धा परीक्षेपासून , शैक्षणिक बौध्दिक गुंवत्येपासून कायमची दूर राहून त्यांचे भविष कायमचे नष्ट व्हावे असे शासनाला वाटते का.. ??? असा सवाल पालक वर्ग करू लागले आहे . गोर गरीब विद्यार्थ्यांची आर्थ हाक लक्षात घेऊन नवोदय विद्यालय परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मार्च महिन्या पर्यंत पुन्हा वाढविण्यात यावी ….