✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.29 नोव्हेंबर) :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती 75 मतदार संघाचे प्रथमच नवनियुक्त भाजपा युवा आमदार करण संजय देवतळे यांचा राष्ट्रीय कुणबी महासंघाचे वतीने त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ , सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अभिनंदन करतेवेळी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक तथा पत्रकार डी के आरिकर राष्ट्रीय महासचिव विलास भाऊ नेरकर जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर कोरडे आणि महाराष्ट्र राज्याचे युवा कार्याध्यक्ष आशिष येडांगे यांची उपस्थिती होती.