✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.18 जुलै) :- ब्रह्मपुरी येथील डॉक्टर बिंजवे दाम्पत्याची मुलगी डॉक्टर ईशा बिंजवे ही काल दिनांक 16 ला सायंकाळच्या दरम्यान घरच्यांना सांगून फिरायला गेली होती .दरम्यान सदर मुलीने ब्रह्मपुरी वडसा महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीमध्ये उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे . सदर मुलगी नदी मध्ये उभी असल्याचा तसेच वाहत जात असल्याचा व्हिडिओ हा समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
डॉ ईशा ने नदी मध्ये उडी घ्यायचे आधी पुलावर MH 48 Z 4176 अक्टिव्हा गाडी,गाडीची चावी,चप्पल,मोबाईल काढून ठेवला होता तो पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती असून सदर घटना ही वळसा हद्दीमध्ये घडल्याने वळसा पोलिसात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास वळसा पोलीस करत आहेत.प्राप्त माहिती नुसार ईशा ने नुकतीच एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली आहे. डॉक्टर ईशानी आत्महत्या सारखी टोकाची भूमिका का घेतली याबद्दल वृत्त प्रकाशित करत पर्यंत माहिती मिळू शकली नाही.
सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार गडचिरोलीच्या रेस्क्यू टीम ला पिंपळगाव निलज च्या हद्दीत मृत देह प्राप्त झाल्याची माहिती आहे.