नंदोरी शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याच्या पाणी कॅन वितरीत Cans of clean drinking water distributed to students of Nandori School

▫️आपल्या गावाचे, समाजाचे आपल्याला देणे लागते व हे आपले आद्य कर्तव्य : रविंद्र शिंदे(We have to give to our village and society and this is our primary duty: Ravindra Shinde)

????शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावा हा प्रयत्न : मंगेश भोयर, शिवसेना (उबाठा) विधानसभा संघटक(An effort to provide clean drinking water to school students: Mangesh Bhoyer, Shiv Sena (Ubatha) Assembly Organizer)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .18 जुलै) :- पावसाळा सुरू झाला असून दुषीत पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडू नये हा चांगला हेतु मनात घेवून शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा संघटक तथा ग्रा.प. नंदोरी उपसरपंच मंगेश भोयर व कृउबा समिती भद्रावती उपसभापती आश्लेषा जिवतोडे-भोयर द्वारा भद्रावती तालुक्यातील नंदोरी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महात्मा फुले विद्यालय, अंगणवाडी आणि श्री कॉन्व्हेन्ट येथे शुध्द पिण्याच्या पाण्याचे कॅन वितरीत केले.

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा सभापती बाजार समीती भद्रावती भास्कर ताजने, भद्रावती तालुका प्रमुख नरेद्र पढाल यांचे मार्गदर्शनात हे कार्य केले असून नियमित शुध्द पाण्याचे कॅन पुरविले जातील असे नमूद केले.

नंदोरी ग्राम पंचायत मार्फत गावकरी करीता शुध्द फिल्टर पाणी सुरू आहे. तेच शुध्द पाणी विद्यार्थ्याना मिळावे हा उदात्त हेतू डोळ्या समोर ठेऊन सरपंच शरद खामनकर, शाळा समिती अध्यक्ष घनश्याम ढवस, उपाध्यक्ष रवींद्र एकरे, सदस्या सपना आत्राम यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद शाळा येथे पिण्याच्या कॅन वाटप करण्यात आले.

आपण ज्या गावात राहतो, समाजात राहतो याचे आपल्याला देणे लागते व यांची सेवा करने हे आपले आद्य कर्तव्य आहे व सर्वानी आपल्या गावाच्या विकासाकरीता मंगेश भोयर व अश्लेषा यांच्या सारखी समाजसेवेच कार्य करत रहावे असे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी कार्याची प्रशंसा करीत मत व्यक्त केले.

याप्रसंगी सदर कार्यक्रमास माधुरी काळे, शिवसैनिक महेश निखाडे, अखिल कुलसंगे, हर्षल डाहुले, गणेश बल्की, प्रथम ठावरी, शुभम ठावरी, तन्मय बलखंडे, सचिन येवले, महेंद्र येवले, मंगेश बल्की, नितेश बुरांडे, चेतन डाहूले, नितेश बल्की, प्रमोद आत्राम, स्वप्नील चामटकर, आकाश शेंडे, अनुराग वाढई तथा शाळेचे मुख्याध्यापक राजगिरे, विषय शिक्षक विनोद आत्राम, विषय शिक्षक किशोर नगराळे, विषय शिक्षक शुभास लांजेकर अंगणवाडी सेविका कुमरे, वत्सला कांबळे आणि मदतनीस उपस्थित होते.