🔸सकल धनगर समाज वरोराचा उपोषणाला पाठिंबा
✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.24 सप्टेंबर) : – पंढरपूर नेवासा फाटा आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धनगर समाज बांधव धनगर जमातिला अनुसूचित जमातिचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाला पाठिंबा म्हणून धनगर बांधवानी संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारच्या विरोधात निर्दर्शने करण्यात येत आहे. त्यामुळे उपोषणला पाठिंबा म्हणून सकल धनगर समाज वरोराच्या वतीने टेमुर्डा येथे रस्तावर यळकोट यळकोट जय मल्हार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, धनगर आरक्षण अंबलबजावणी झालीच पाहिजे,या घोषणाबाजी नागपूर – चंद्रपूर महामार्गांवरील टेमुर्डा येथे करण्यात आले.
यावेळी अधिकार नसतानाही धनगर आरक्षणाचे फायदा घेतलेल्या काही आदिवासी संघटना धनगर विरोधी आंदोलन करीत असून राज्याचे वातावरण खराब करीत आहे. या असंविधानीक गोष्टीची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे. तसेच केंद्र व राज्य सरकारने धनगर समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे व आरक्षनाची अंबलबजावणी करावी असे निवेदन तहसील कार्यालय वरोरा येथील तहसीलदार यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात धनगर जमातची लोक संख्या तब्बल दोन कोटी असुन धनगर समाज आर्थिक व शैक्षणिक बाजूने मागासलेला समाज वर्ग आहे आहे.
त्यामुळे आरक्षण अंबलबजावणी करणे गरजेचे आहे असे व्यक्तव धनगर कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष संजय बोधे यांनी केले.
याकरिता धनगर संघर्ष समिती तालुका अध्यक्ष गजानन शेळकी, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य विलास झिले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती आयोजक गणेश चिडे, महासंघ तालुका अध्यक्ष योगीराज चामाटे, माजी कृ. उ. बा. समिती सदस्य बंडुजी शेळकी,डाँ. सरवदे,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भोयर, माजी सरपंच मारोती झाडे, माजी सरपंच दिलीप तुराळे, ग्रामपंचायत सदस्य शेखर थाटे, राकेश टापरे, विजय धवणे, राजू झिले, सचिन चिडे,अक्षय झिले,प्रणाल थाटे, हरिदास तुराळे, महादेव गावंडे, मंगेश झिले, शुभम थाटे, रुमीत तुराळे, शरद झिले, नामदेव करडे, राजेंद्र तुराळे, रामभाऊ करडे, विश्वनाथ थाटे व धनगर समाज बांधव उपस्थित होते.