✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.23 सप्टेंबर) :- घुग्घूस येथून जवळच असलेल्या म्हातारदेवी -शेणगाव रस्त्यावरील असलेल्या तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसरा मृतदेह शिदूर येथील तलावात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार पिपरी गावातील एक तरुण दिनांक 19 सप्टेंबर पासून बेपता होता त्याचा मृतदेह म्हतारदेवी-शेणगाव रस्त्यावर असलेल्या तलावात तरंगताना आढळून आला. मृतकाचे नाव सूरज रत्नाकर ठोंबरे (30)वर्ष रा. पिपरी (देशमुख )असे आहे. तो एका खाजगी कंपनीत कंत्राटदाराकडे मजुरीचे काम करीत होता त्याचा मृतदेह चार दिवसांनी आढळून आला.
तर शिदूर येथील तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
एकाच दिवशी दोन तलावात दोन तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही प्रेत तलावातून बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
वृतलिहीत पर्यंत एका अनोळखी मृतकाचे नाव कळू शकले नाही.