दूधशेष मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने रक्कम पळवली

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .10 मार्च) :-  शहरातील दुधाळा तलावाच्या काठावर असलेल्या दुदशेष महाराज मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने दानपेटीतील रोख रक्कम लांबविल्याची घटना दिनांक नऊ रोज शनिवारला सकाळी उघडकीस आली. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात चोट्याचा शोध घेत आहे. महाशिवरात्रीनिमित्त सदर मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती व ही दानपेटी गेल्या दोन वर्षात उघडण्यात आली नसल्यामुळे या दानपेटीत मोठी रक्कम असावी असा अंदाज आहे.

अज्ञात चोरट्याने मध्यरात्री नंतर दानपेटी फोडून रोख रक्कम लांबविली व चिल्लर पैसे दानपेटीतच सोडुन दिले. सकाळी ही दानपेटी फोडल्याचे लक्षात आल्यानंतर सदर घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली. शहरात या आठवड्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या चोरट्यांना पकडण्यात अद्याप पर्यंत भद्रावती पोलिसांना यश आलेले नाही. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.