✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.31 ऑक्टोबर) :- दिवाळी सण आनंदाचा, सण हर्षोउल्हाचा, सण नात्याचा. सण दिवाळीत, कर्तव्यात कसलाही कसूर न करता, देशाच्या सीमेवर मातृभूमी च्या रक्षणार्थ सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर, अहोरात्र पहारा देत असतात.
सैनिक कुटुंबियांच्या या असीम त्यागाला स्मरण करून, मांगल्याचे प्रतिक म्हणून मानला जाणारा दिवा..सिमेवर तैनात सैनिकांसाठी लाऊन, त्यांच्या आणि त्यांचे परिवारांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, त्यांना दिर्घायुष्य लाभावे, यासाठी *दिवाळीचा एक दिवा सीमेवरील सैनिकांसाठी* *हा कृतज्ञतेचा सोहळा, फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर, वरोरा आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद, तालुका – वरोरा यांच्या नेतृत्वात शहीद स्मारक परिसर वरोरा येथे साजरा करण्यात आला.
असा सोहळा समाजातील प्रत्येक स्तरावर राबवायला पाहीजे, आपल्या कृतीतून देशभक्ती दिसायला हवी तेंव्हाच आपण समाजात देशभक्तांची फौज तयार करण्यात यशस्वी होऊ, असे विचार अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, वरोरा चे अध्यक्ष पूर्व सैनिक डी. एन. खापनेसर यांनी मांडले.
हे विर जवान – तुझे सलाम, भारत माता की जय चा नारा देत, पूर्व सैनिक कॅप्टन वामनराव निब्रडसर, माजी मुख्याध्यापक मा. बुऱ्हाण सर, विर माता सौ. डाहूलेताई, पूर्व सैनिक नारी शक्ती सदस्या सौ. सपाटे ताई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, या कृतज्ञता सोहळ्याची सुरुवात झाली . यानंतर फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर चे खेळाडू विद्यार्थी, उपस्थित माजी सैनिक, व गणमान्य नागरिकांनी दिवा लावून, आपली देशभक्ती व सिमेवर तैनात सैनिकांप्रती कृतज्ञता आणि दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा व्यक्त करून सोहळा पार पडला.
यावेळी, पूर्व सैनिक ; वसंतराव काकडे, माजी सैनिक रमेशजी आवारी, माजी सैनिक गजाननराव उपरे,माजी सैनिक सुपुत्र मुकेश जिवतोडे, माजी सैनिक प्रविण चिमूरकर, रूपेश्वर कुतरमारे, कराटे कोच रवी चरूरकर आणि सहकारी, शहीद शिपाई योगेश डाहूले परिवारातील सदस्य व मित्र मंडळी, महेश श्रीरंग यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.