✒️सुयोग सुरेश डांगे चिमूर (Chimur विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि .22 नोव्हेंबर) :- प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व्दारा संचालित बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमीच्या वतीने उमरेड तालुक्यातील मौजा राजुलवाडी येथे दिनांक २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी तीन दिवशीय निवासी धम्मसाधना शिबिर आयोजीत करण्यात आले आहे.
उमरेड (जि. नागपुर) तालुक्यात मौजा राजुलवाडी येथे धम्म कार्य करीत असलेल्या प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व्दारा संचालित बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमीच्या वतीने आयोजीत शिबिरात अष्टांगीत मार्ग, शिल, समाधी, प्रज्ञा व कायानुपस्सना, वेदना, उपासना, चित्तानुपस्सना, धम्मानुपस्सना यांचे शिबिरार्थीकडुन प्रत्यक्ष पालन करण्यात येईल. या शिबिरात धम्म शिक्षक सेवानिवृत्त सनदी अधिकारी शाम तागडे यांचे मार्गदर्शन राहणार आहे.
दिनांक २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी तीन दिवशीय निवासी धम्मसाधना शिबिरात सहभागी होण्याकरीता डॉ. माया ब्राम्हणे ९४२२४६८७४६, राजरतन कुंभारे ९४२२११४१६५ यांचेशी किंवा www.pmpdhamma.org (Course) वर संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य नरेंद्र शेंडे, विमल रामटेके, डॉ. पंडीत फुलझेले, सुखदेवजी नारनवरे, डॉ. कबीर रावळेकर, गोविंद बनकर, वसंत शिंगाडे यांनी आवाहन केले आहे. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमी राजुलवाडी हे ठिकाण नागपुर उमरेड मार्गावरील उदासा या गावापासुन पुर्वेस ७०० मीटर अंतरावर आहे.