दारू माफिया अंजु अन्ना यांचे टेमुर्डा देशी दुकानाला मंजुरी देऊ नका

🔹महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.19 जुलै) :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी जिल्ह्याय 200 पेक्षा जास्त मद्य परवाने बेकायदेशीरपणे वाटून कोट्यावधी रुपयांची माया जमवाली हा त्यांच्यावर आरोप होतं असतांना ते एक लाख रुपये लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले व निलंबित झाले पण आजही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अधिकारी लाच घेण्यास पुढे असून वरोरा तालुक्यातील खांबाडा या गावांतील श्री अंजनेयलु सम्बया जोंगेनी यांच्यावर ते मेहरबान आहे, या दारुमाफिया व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल असतांना खांबाडा येथील आकाश बार ची बेकायदेशीर परवानगी आणि आता टेमुर्डा येथे देशी दारू दुकानासाठी परवानगी दिल्या जातं आहे.

यासाठी उद्या दिनांक 19 जुलैला टेमुर्डा येथे केवळ देशी दारू दुकानाची मंजुरी करिता ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे सदस्य यांनी आमसभा घेण्याचे ठरवले आहे, विशेष म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी जर ग्रामसभा घेतं असेल तर मग सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ग्रामपंचायत प्रशासन असंच सजग असतं काय? हा प्रश्न असून ज्या महिलांना दारू दुकान सुरू करायची परवानगी द्यायची की नाही हा अधिकार मतदानातून मिळाला त्या महिलांना ह्याच अंजु अन्ना यांनी पैसे वाटल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे दारू माफिया अंजनेयलु सम्बया जोगेनी याच्यावर अनेक पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हे दाखल असतांना त्यांच्या माध्यमातून टेमुर्डा परिसरात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे देशी दारू दुकानाची परवानगी त्यांना देऊ नये अन्यथा या परिसरातील महिलांना भगिनींना घेऊन मनसे तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

वरोरा तालुक्यातील खांबाडा या गावात अनेक वर्षापासून श्री अंजनेयलु सम्बया जोगेनी ह्या आंध्र प्रदेशातील व्यक्तीने अवैध दारू विक्री चालवली असून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत आर्थिक देवानघेवाण करून स्वतःचे आकाश बिअर बार चे लायसन्स खोटे दस्तावेजाच्या आधारे स्थानिक नागरिकांचा विरोध व तक्रार असतांना मिळविले. हा व्यक्ती सुरुवातीपासून अवैध दारू विक्री करायचा व त्यांच्यावर दारूबंदी आणि कोरोना काळात वरोरा, भद्रावती, माजरी, शेगांव या पोलीस स्टेशन मधे व जिल्ह्याबाहेरिल पोलीस स्टेशन मधे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहे.

दरम्यान दारूबंदी उठल्यानंतर त्यांनी नव्याने बिअर बार सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या स्वयंघोषणापत्रात माझ्यावर कोणत्याही पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल नसल्याचे नमूद केलेले आहे व जर माझे गैरप्रकार उघडकीस आल्यास माझे लायसन्स रद्द होण्याच्या कार्यवाहीस मी पात्र ठरेल असे स्वाक्षरीनिशी घोषणापत्र दिले आहे तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे लायसन्स रिन्युअल करून त्यांची पाठराखण केल्याने त्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

कोण आहे हा अन्ना

अंजनेयलु सम्बया जोंगेनी हा खांबाडा येथे सन २००६ मधे बाहेर प्रांतातून आला होता व त्यांनी येथील एका व्यक्तीचे घर घेऊन सन २०१० च्या दरम्यान होटेल सुरु करण्याबाबत ग्रामपंचायत ला अर्ज केला होता.त्यावेळी ग्रामपंचायतने ना हरकत दिल्यानंतर एका सदस्याने यावर हस्तक्षेप घेतला व नंतर तो मैनेज होऊन पुन्हा त्या होटेल आकाश ला तहसीलदार यांच्या मार्फत ईटिंग लायसन्स देण्यात आले.

पण खांबाडा येथे आकाश बार साठी ग्रामपंचायत ने कुठलीही एनओसी दिलेली नसून तत्कालीन तहसीलदार यांनी पैसे घेऊन त्यांना होटेल च्या ईटिंगचे लायसन्स दिले होते, गावांतील महिलांनी तहसीलदार यांनी दिलेल्या इटिंग लायसन्स चा सुद्धा विरोध केला असतांना त्यांना इटिंग लायसन्स मिळाले. पण बार लायसन्स करिता त्यावेळी ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे होते ते नसताना लायसन्स मिळाले कसे याचे कोडे अजूनही सुटले नाही.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अंजनेयलु सम्बया जोंगेनी यांच्यासोबत मिळाले असून टेमुर्डा येथे देशी दारू दुकान उघडण्यासाठी त्यांनी टेमुर्डा ग्रामपंचायत मध्ये ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला, त्या निमित्याने उद्या दिनांक 19 जुलै ला ग्रामसभा होणार आहे, या ग्रामसभेत आपल्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी त्यांनी महिलांना पैशाचे अमिश देऊन पैशाचा वाटप सुद्धा केला आहे.

माहितीनुसार याचं अन्ना ने फत्तेपूर या गावाजवळ देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी गावातील महिलांना दिवाळी दरम्यान मोफत साखर वाटप केली होती, पण गावकऱ्यांनी अंजु अन्ना यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाही त्यामुळे तो टेमुर्डा गावात देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही वर्षांपूर्वी टेमुर्डा या गावात असलेल्या देशी दारू दुकानाला स्थानिक महिलांनी विरोध करून ते दुकान बंद केले होते. मात्र अंजु अन्ना याला दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा करायचा असल्याने ते टेमुर्डा येथे देशी दारू दुकान सुरू करण्यास इच्छुक आहे .

मात्र जर या टेमुर्डा गावात देशी दारू दुकान झाले तर ग्रामीण मोठी बाजारपेठ असलेल्या टेमुर्डा येथील गुंडगिरी सुरू होऊन युवकांना व्यसन लागू शकते व सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाला मान्यता देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टेमुर्डा व आजूबाजूच्या 20 गावातील नागरिकांना घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी व अंजु अन्ना याचेवर कार्यवाही करून खांबाडा येथील आकाश बार चे लायसन्स रद्द करावे अशी मागणी सुद्धा राजू कुकडे यांनी दिली, यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, पियुष धुपे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.