🔹सा. का. राजू चिकटे , अक्षय बोंदगुलवार , ठाणेदार यादव यांचे मोठे श्रेय
🔸कुटुंबाने तसेच गावकऱ्यांनी मानले आभार
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.22 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या भेंडाळा येथील वरोरा चिमूर महामार्गावर बस च्या अपघातात दुचाकी चालवणारा युवक मुलगा हा जागीच ठार झाल्याची घटना दि. २० तारीख रोज रविवार ल सकाळी घडली . मृतक युवक हा भेंडाळा येथील रहिवासी असून तो आपल्या शेतामध्ये शेत पाहणी करिता जात होता अचानक चिमूर येथून येत असलेल्या चिमूर चंद्रपूर या बसने बेधडक दिली असता या युवकाचा मुलाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना वाऱ्यासारखी पसरली असता शेगाव येथील युवा कार्यकर्ते तसेच गावातील नागरिकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करून वरोरा चिमूर हा मार्ग बंद केला हा मार्ग किमान पाच ते सात बंद असल्याने नागरिकांची तसेच प्रवाशांची ताराबंळ उडाली शेगाव येथील कार्यकर्ते अक्षय बोंदगुलवार व त्यांच्या युवा कार्यकर्त्यांनी रस्ता जाम करून पीडित मृत झालेल्या कुटुंबी यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी अट मांडली तेव्हा येथील ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांनी सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संताप झालेल्या नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु संताप झालेली जनता अधिकच चिडलेली असल्याने जो पर्यंत मृत झालेल्या मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला मिळनार नाही तो पर्यंत आम्ही रस्ता खुला करणार नाही .अशी अट धरली होती.
ही घटना व हा अपघात के सी सी कंपनी च्या हलगर्जी पणामुळेच हा अपघात झाला व मुलाचा जीव गेला असे सांगितले असता तेव्हा ठाणेदार यादव यांनी के सी सी कंपनी च्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविले असता येण्यास त्यांनी अधिकच विलंब केला व अखेर पाच तास लोटून घटना स्थळी काही अधिकारी आले तेव्हा शेतकरी पुत्र राजू चिकटे यांनी के सी सी कंपनी च्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले व संतापाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्या नाहीतर याचा परिणाम अधिक भोगावा लागेल अशी धमकी दिली तेव्हा राजुभाऊ चिकटे अक्षय बोंदगुलवार , ठाणेदार यादव व संताप असलेल्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन के सी सी कंपनी च्या अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु आम्हाला आश्वासन नको आम्हाला आता च्या आता मोबदला द्या राजू भाऊ चिकटे यांनी अशी धमकी दिली असता . यांच्या मागणीवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १२ लाख रुपयांचा धनादेश दिला. व अखेर सात तासांनी वरोरा चिमूर महामार्गावर खुला करण्यात आला .
तेव्हा पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी तसेच भेंडाळा वासियानी राजू चिकटे अक्षय बोंदगुलवार , अभिजित पावडे, व ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांचे आभार मानले . व घटना स्थळी असलेले आरोपी बस चालक यांना अटक करून वरोरा चंद्रपूर धावणारी चिमूर आगाराची बस क्रमांक mh ४० bl ३९८८ या बस ला शेगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली .