▫️राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान(Public awareness campaign in Nagpur for honoring national flag)
✒️नागपूर(Nagpur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.21 ऑगस्ट) :- नाग स्वराज फाऊंडेशन द्वारा आयोजित आणि “कामयाब फाऊंडेशन” व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान उत्साहात पार पडले.
नाग स्वराज फाऊंडेशन या सामाजिक संस्थे द्वारा वर्ष 2010 पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत* आहे. या अभियांनाद्वारे कागदी, प्लॉस्टिकचे व कापडी ध्वज(तिरंगा) उचलण्याचे कार्य संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले, जीर्ण झालेल्या कागदी, प्लॉस्टिकचे व कापडी ध्वज(तिरंगा) उचलते.
26 जानेवारी व 15 ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ घेवून फिरतात आणि खराब जीर्ण, फाटलेले, कुजलेले (तिरंगा)ध्वज कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून *नाग स्वराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीने दि.15 ते 18 ऑगस्ट या चार दिवसात 112च्या वर कागदी ,प्लॉस्टिकचे आणि कापडी राष्ट्रीय ध्वज* जमा केले.
यावेळी अभियान दि.11 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत जनजागृती अभियान झाले. या अभियानाच्या दरम्यान शाळा, महाविदयालयातील विद्यर्थीना स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आले.
या अभियाना मध्ये नाग स्वराज फाऊंडेशनचे सचिव हितेश डोर्लीकर, मीनल ताजणेकर, स्मिता बावनकर, हर्षा डोर्लीकर, प्रतीक्षा खोटपाल, यज्ञेश कपले, दिव्या राहाटे, पूजा तिडके, सुषमा साखरकर, मयुरी ठवकर, हेमंत पराते या युवा कार्यकर्तेनि अथक परिश्रम घेतले.