✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrwati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.22 ऑगस्ट) :- तालुक्यात सतत डेंग्यूचा प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे.या डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे जनतेचा जीव धोक्यात आला आहे.डेंग्यूचा आजार तालुक्यात सतत वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे .
तरी यावर उपाय योजना म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावात मच्छर किट नाशक फवारणी आठवड्यातून दोन दिवस करण्यात यावी असे निवेदन गट विकास अधिकारी भद्रावती याना आम आदमी पार्टी चे तालुका प्रमुख सुरज खंगार यांनी दिले.