तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाला लागला ब्रेक

🔸लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या इच्छा शक्तीचा दिसत आहे अभाव

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.29 नोव्हेंबर) :- शेगाव हे वरोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी नागरिकांना सुविधेचा अभाव असून ग्रामीण भागात विकासाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागलेल दिसून येत असून प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनमुळे जनतेला स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतरही अनेक सुविधापासून वंचित राहावे लागत आहे.

शेगाव हे बाजारपेठेचे मुख्य गाव म्हणून तालुक्यात ओळख निर्माण केलं मोठ्या प्रमाणात रोज लाख रुपयाचे व्यापाऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक दुकानातून आर्थिक देवाण-घेवाण होत असते या गावाला 70 ते 80 गावे जोडली असून ग्रामीण भागातून जनता या ठिकाणी नेहमीच येत असतात या ठिकाणी मागील पाच वर्षापासून नागरिकांच्या सुविधेसाठी असलेली आरोग्य केंद्राची इमारत धुळखात पडली आहे, तसेच मागील सात वर्षांपासून वरोरा, चिमूर हे राष्ट्रीय महामार्ग (353-ई ) बांधकाम रखडले असून हे बांधकाम एस आर के (srk) कंपनी कंट्रक्शनला देण्यात आले परंतु आजही ठीक ठिकाणी मोठे गड्डे, सिमेंट रस्त्याला भेगा पडले असून रस्त्याच्या बांधकामात दुर्लक्ष केल्याने रस्ते अपघातात वारंवार नागरिकांना जीव गमवावे लागत आहे.

तर काहींना अपंगत्व आले असून कंपनीच्या चुकीच्या कामामुळे रस्त्या लगत असलेल्या शेतकऱ्यांना आजही शेती पिकांचे नुकसान सहन करावे लागते, कर्मचारी वर्ग, शालेय विद्यार्थिनी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यामुळे मानेच्या व कमरेचा त्रास वाढला सतत उडणारा धुळीमुळे श्वसनाच्या त्रास होत आहे,तसेच शेगाव येथे काही वर्षा अगोदर मंडळ कृषी कार्यालय होते, परंतु त्या ठिकाणी सरकारी इमारत न मिळाल्यामुळे आज हे कार्यालय शेगावच्या नावाने तालुक्यात असून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, त्याचबरोबर फॉरेस्ट ऑफिस सुद्धा आजही मोडकळीस अवस्थेत पडलेले आहे.

शेगावला सोमवारला मोठा बाजार भरत असतो त्या ठिकाणी दुकानदारांना रात्रीच्या सुमारास स्टिट लाईटचे व्यवस्था नसून हजारो रुपये खर्च करून लाईटचा खंबा धुळखात पडलेला आहे, तसेच लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले वटे सुद्धा कचऱ्याने माखलेली आहे, त्यामुळे दुकानदार, नागरिकांना त्रास होत आहे, तालुक्यात, परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेगाव सहीत ग्रामीण भागात कामे सुरू करण्यात आले असून आजही नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे ग्रामीण भागात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढ झाली आहे.

अनेक दिवसापासून तालुक्यातील ग्रामीण भागासहीत चारगाव, अर्जुनी कोकेवाडा लालपरी बंद असून शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना प्रवाशादरम्यान खाजगी वाहनाचा वापर करून प्रवास करावा लागतो, तसेच रस्ते खराब असल्यामुळे शेगाव टेंमुडा, चारगाव, वडधा, साखरा, दादापुर,मुधोली, कोकेवाडा, आष्टा, घोसरी, वडाळा,मानोरा, तर अर्जुनी तुकुम येथील पंधरा वर्षापासून गावातील मुख्यरस्ता (डांबररोड ) वंचित राहिलेला आहे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही गावे डांबर रस्त्याची वाट बघत आहे.याकडे आजही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.