✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.20 सप्टेंबर) :- डॉ. दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून त्यात 25 Good रक्तदात्यानी रक्तदान केले तसेच रक्ताच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या . डॉ अविनाश अघोर यांनी उपस्थित मंडळींच्या डोळ्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या . प्रसिद्ध मनसोपचारतज्ञ डॉ राजेश इंगोले यांनि उपस्थित राहून रुग्ण तपासणी केली, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र युसूफ वडगाव यांच्या वतीने आयुष्यमान कार्ड व प्रौढ क्षयरोग लसीकरण करण्यात आले,150 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.बिडचे लाडके खासदार मा बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरव सोनवणे, समाजसेवक अमोल लोंढे, सूरज खोडसे वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते. वेदांतचार्य विवेकानंद महाराज शास्त्री, गणेश महाराज माळेगावकर,डॉ केशव सारुख, डॉ सुमित मुंडे, डॉ शाम पाटील, डॉ चैतन्य कागदे, डॉ प्रज्ञा तरकसे, डॉ बलराज राठोड, डॉ कृष्णा पवार, डॉ उत्तम खोडसे, युवा उद्योजक गणेश चिरके, युवानेते किरण सातपुते, डॉ खोडवे, राहुल केंद्रे सुनील ठोसर, ज्ञानेश्वर गिरी, महादेव राऊत, अशोक देवकर, अविनाश बोराडे, मनोज भोसले, बाळकृष्ण तपसे, आश्रुबा वागमारे, फिरोज शेख डॉक्टर दत्ता तपसे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित होते . पत्रकार सारंग महाजन यांनी डॉक्टर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.