डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या कडून विद्यार्थी व बालकांना बुक पेन मिठाई चे वितरण

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.3 सप्टेंबर) :- विदर्भातील प्रसिद्ध असलेले नेत्रतज्ञ तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले नेत्रतज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री डॉक्टर चेतन खुटेमाटे हे गेल्या अनेक दिवसापासून जनतेच्या नागरिकांच्या सेवे करिता सदैव तत्पर असून सामाजिक क्षेत्रात अधिक रुची असल्याने जनतेच्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या हिताकरिता सदैव झटत आहे.

शिवाय वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात नव्याने पाऊल रोऊन आमदारकी या पदासाठी अथक प्रयत्न करीत आहेत त्यांनी अनेक गावोगावात निःशुल्क डोळे तपासणी ,तसेच चष्मे वितरण मोहीम राबवित आहेत त्यांच्या या मोहिमेने अनेक गावात गाव खेळ्यात त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.करिता चारगाव बू येथे आज तान्हा पोळ्या च्या शुभ मुहूर्तावर बालगोपाल विद्यार्थी यांना नोटबुक , पेन , चॉकलेट , रोख बक्षीस वितरण करण्यात आले.

सदर हे साहित्य गावातील सरपंच श्री योगेश वायदुळे, पोलीस पाटील , राजू थुल , तमुस अध्यक्ष श्री आतिश भलमे , शरद भोगेकर , महेश शास्त्रकर , पिंटू सोनेकर , रवी चौखे , विजय डवरे , मनोज गाठले , इत्यादी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी राबविलेल्या या संकल्पनेने गावात व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या या कार्याबद्दल गावात कौतुक केले जात आहे.