✒️ आम्रपाली गाठले शेगाव बूज(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.16 नोव्हेंबर) :- स्थानिक शेगाव चारगाव साखरा या परिसरामध्ये डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी जनतेशी गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्या तर इतकेच नव्हे तर डॉक्टर की पेशात असल्याने ते मुख्य म्हणजे ते डोळ्याचे सर्जन आहेत.
तेव्हा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला दूरदृष्टी मिळावी याकरिता प्रत्यक्ष गाव गावात खेड्या पाड्यात जाऊन डोळे तपासणी तसेच चष्मे वाटप उपक्रम राबवून जनतेची सेवा केली व गरीब जनतेची निस्वार्थ सेवा केली. याची परतफेड म्हणून ग्रामीण भागातील शेतमजूर शेतकरी मजूर वर्ग आज डॉक्टर चेतन खुटेमाटे यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे.
डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी जनतेला दूरदृष्टी देऊन लोकांचे मने जिंकली याच सोबत या परिसरात अंगुठा छाप आमदार नको . स्वार्थी आमदार नको , सदैव गोर गरीब शेतकरी शेत मजुरांचा पाठीशी असणारा आमदार असावा . गरीब जनतेल सदैव चोवीस तास सेवा देणारा असावा. अशा अनेक गोष्टी लक्षात घेत आता आम्हाला फक्त नि फक्त शिकला सावरला सुशिक्षित डॉक्टर असलेला आमदार म्हणून असलेला माणूस हवा .
तेव्हा सर्वस्वी गरिबांचे स्वप्न पूर्ण करणारा उमेदवार हा फक्त लोकांच्या समोर डॉक्टर चेतन खुटेमाटे यांचा चेहरा समोर येत आहे तेव्हा दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या ७५ वरोरा भद्रावती विधानसभा निवडणुकीत आमदार की पदाचा बाहुबली डॉक्टर चेतन खुटेमाटे बनू शकतो हे नागरिकांच्या तसेच मतदार दोंडून ऐकायला मिळत आहे.