टोल घेता आणि लोकांना गड्डे देता ..सुरज शहा यांचा नंदोरी टोल नाका इथे संताप

🔹आम आदमी पार्टी चे नंदोरी टोल नाका इथे निवेदन

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.12 ऑगस्ट) :- आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांनी नंदोरी टोल नाका इथे निवेदन देत संताप व्यक्त केला. पावसामुळे नागपूर – चंद्रपूर – वरोरा – भद्रावती क्षेत्रात महामार्गाला मोठे मोठे भोगदळ पळले आहे ज्या मुळे सामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रात्री चा वेळेला गड्डे पावसामुळे दिसत नसल्यामुळे सतत दुर्घटनेचे प्रमाण या महामार्गावर वाढत आहे व मृर्त्यू ची संख्या सुद्धा वाढत आहे.

मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव गमावावा लागत आहे ज्या मुळे सामान्य नागरिकांचा परिवार उद्ध्वस्त होत आहे. सतत होणाऱ्या दुर्घटनेच्या वाढत्या प्रमाणा मुळे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांना वारंवार नागरिकांचे तक्रार मिळत होती. दूरध्वनी द्वारे टोल नाका चे अधिकारी सोबत बोलुण सुद्धा रोड चे काम होत नसल्या मुळे वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांनी निवेदन देण्या करिता टोल नाका नंदोरी इथे अधिकाऱ्यांना भेट दिली.

त्यावेळी अधिकाऱ्यांवर सुरज शहा यांनी संताप व्यक्त केला की सामान्य जनते कडून टोल वसुली करता पण तुम्ही सामान्य लोकांना चांगल्या रस्त्यांची व्यवस्था करू शकत नाही. या रोडामुळे कित्येक परिवार उद्ध्वस्त होत आहे याचा जबाबदार कोण ? असा संतापजनक प्रश्न सुरज शहा यांनी अधिकाऱ्यांना केला आहे. येत्या सात दिवसात रोड दुरस्ती करा अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे येणाऱ्या दिवसात हा टोल नाका बंद केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुरज शहा यांनी दिला आहे.

त्यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवर, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपलशेंडे, वरोरा तालुका उपाध्यक्ष वरोरा शहर अध्यक्ष बंटी खडके, सुरज खंगार, ओम पारखी, कार्तिक नागपुरे, राजकुमार चट्टे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.