टेमुर्डा येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.7 सप्टेंबर) :- चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने टेमुर्डा येथे रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उदघाटन मा.जर्नादन पा.देठे यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन मा.सुचिता ठाकरे,विलास झिले,राजु तिखट,प्रकाश विरुटकर,डाॅ.अमित झिले,डाॅ.बोंडे,लहू ठक,किरण ढोक,जया चिंचोलकर.

पुष्पा हिरादेवे,सुनिता मेश्राम,वैशाली दरेकर,शुभांगी दातारकर,दुर्गा तोडासे,संतराज कुळसंगे,शंकर दडमल,बेबीताई किन्नाके,सुरेखा लभाने,ताराचंद खिरटकर,देवराव भोगेकर,निलीमा इंगोले,पुष्पाकर खेवले,सुरेश माथनकर,यश काकडे हे मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ टेमुर्डा परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.