✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.28 डिसेंबर) :- झाडीबोली साहित्य मंडळ साकोली द्वारा आयोजित, झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा च्या रोप्य महोत्सवी पर्वावर दिनांक २८/१२/२०२४ ला ” झाडीबोली साहित्य संमेलन ” श्रद्धे बाबा आमटे साहित्य नगरी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न झाले.
या झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये, कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मान. श्री लोकराम शेंडे ज्येष्ठ साहित्यिक, कार्यक्रमाचे उद्घाटक मान. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्र, प्रमुख पाहुणे मान. श्री विकासभाऊ आमटे समाजसेवक आनंदवन, ज्येष्ठ साहित्यिक मान.श्री डॉ. हरिश्चंद्रजी बोरकर यांचे शुभहस्ते नवं कवी नीरज आत्राम लिखित ” काय म्हणतील लोक” या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
या कार्यक्रमाला मान. श्री इंजि. भाऊ थुटे प्रसिद्ध प्रबोधनकार, मान. श्री सुधाकर जी अडबाले शिक्षक आमदार चंद्रपूर, मान. डॉ. हेमकृष्ण कापगते, मान. ऍड. लखनसिंह कटरे, मान.श्री हिरामणजी लांजे, मान.श्री राजन जयस्वाल, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य श्री ना. गो. थुटे या आदरणीय पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कवितासंग्रहाला साहित्यिक मान. श्री, अशोक कुबडे ‘ गोंडर ‘ कार यांची प्रस्तावना लाभली, तर सौ. प्रांजली काळबेंडे मुंबई, श्री आनंद घोडके सोलापूर,डॉ. श्री श्याम मोहरकर चंद्रपूर, यांच्या शुभेच्छा लाभल्या.या कार्यक्रमाला बहुसंख्या कवी,कवयित्री साहित्यिक, कलाकार, आणि बहुसंख्य लोकांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी सर्व मान्यवर पाहुण्यांनी कवी नीरज आत्राम यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.