झरपट नदीच्या पुलावरून कार वाहून गेली ; जीवित हानी नाही

✒️शिरीष उगे चंद्रपूर (Chandrapur प्रतिनीधी) 

चद्रपूर(दि .29 जुलै) : – शहर जिल्ह्यात नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सुमारे बाराशे मिलिमीटर वार्षिक पर्जन्य सरासरी असलेल्या या जिल्ह्यात आजच्या दिवसांपर्यंत 70 टक्के पाऊस पडला आहे.

यामुळे नदी नाले व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीच्या कमी उंचीच्या पुलावर पुराच्या पाण्यातून कार घालणे वाहन चालकाला महाग पडले. अत्यंत खळाळणारा प्रवाह दिसत असताना या कारमधील दोघांनी कार पुढे दामटली. मात्र अर्ध्या रस्त्यात कार हेलकावे घेऊ लागली. थोड्या वेळातच कार पुलावरून खाली कोसळली. या कारमध्ये असलेल्या दोघांनी दार उघडून कसेबसे झाडाला धरून ठेवल्याने बचावले. पुराच्या पाण्यात वाहन घालू नका अशा आशयाचे आवाहन केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडत आहेत.