जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज स्थापनादिन साजरा 

✒️ जगदीश पेंदाम (शंकरपूर प्रतिनिधी)

शंकरपूर (दि.25 सप्टेंबर) :- चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 24 सप्टेंबर रोजी समाजसुधारक, क्रांतिसुर्य मा. ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या निमित्ताने सत्य, विज्ञानवादी, सुधारणावादी, समता, स्वातंत्र, बंधुता व न्यायाचे पुरस्कर्ते थोर पुरुषांच्या प्रतिमा जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दान देण्यात आल्या.

स्मुतिशेष सूर्यभानजी शेंडे ह्यांच्या स्मुतीप्रीतर्थ आयु. स्वप्नील वासनिक रा. शेडेगाव यांनी महाकारुणिक तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच दान आयु. भावना धनराज शेंडे यांचे हस्ते तर आयु.निखिल कवडू शेंडे यांनी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज,आयु. भीमाबाई भाऊरावजी गजभिये यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक महान तर आयु. काजल शैलेश ठवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच दान केले. त्रिशरण पंचशील घेत बुद्धांना वंदन करीत या दानाचा समाजातील जेष्ठ उपासक – उपासिका आयु. लक्ष्मणजी रामटेके, भाऊरावजी गजभिये, तुकाराम भिमटे, रामदास रामटेके, कवडूजी शेंडे, विठ्ठल कुमरे, यशोदाबाई मेश्राम.

चंद्रभागाबाई शेंडे, सुलोचनाबाई पाटील, गुनाबाई डेकाटे, लिलाबाई बोरकर, कुंदाबाई मेश्राम, यांच्या हस्ते स्विकार करून दान देणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी आयु. दुर्योधन गजभिये, आशिक रामटेके, नितेश डेकाटे, प्रदीप मेश्राम, योगेश मेश्राम आदी उपस्थीत होते.