✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि. 26 एप्रिल) : –
चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 312.51 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच 65 पशुधनाची जीवित हानी व पाच पशुधन जखमी झाले आहेत. वादळ वारा, गारपीठ, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 312 घरांचे व गोट्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना व शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तलाठ्यानमार्फत तात्काळ पंचनामे करून आवश्यक निधी मागणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.