जिल्हा परिषदेच्या शेगाव प्राथमिक शाळेची वरोरा तालुक्यात उत्तुंग भरारी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बु (दि .1 फेब्रुवारी) :- तालुक्यातील शेगाव (बु.) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने विविध स्पर्धा व उपक्रमांनी वरोरा तालुक्यातील उत्तुंग भरारी घेतली आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

  तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा यात या शाळेचा प्रथम क्रमांक, नवरत्न स्पर्धा ,तालुक्यात ३ स्पर्धेत प्रथम क्रमांक, अध्ययन स्तर तालुक्यात प्रथम, तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत दर्शनीय कवायत प्रथम, समूह गीत गायन स्पर्धेत द्वितीय, वैयक्तिक नृत्य द्वितीय क्रमांक मिळविला असून ही शाळा अध्ययनासोबतच शाळेत विविध उपक्रम राबविते. या शाळेत दर शनिवारला घेण्यात येणारे योग नृत्य प्रसिद्ध आहे.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पोलीस स्टेशन शेगाव बु. येथे या शाळेने सादर केलेल्या दर्शनीय कवायतीने गावकऱ्यांचे मन जिंकले. शाळेच्या बौद्धिक, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक, विकासाकरिता वेगवेगळे उपक्रम राबविण्यास शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनंता आखाडे यांचे नेतृत्वात भगत सर, साखरकर सर, पाटील मॅडम, बगडे मॅडम, नगरारे मॅडम उल्लेखनीय कार्य पार पडण्याकरिता मौलिक कामगिरी बजावत असतात.