जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज चे विद्यार्थी विजेते

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.22 सप्टेंबर) :- 18 ते 20 सप्टेंबर ला जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले. वयोगट नुसार घेतलेल्या या स्पर्धेत U 14 (मुले/ मुली) मधे युगा निखारे, अनुराग मेश्राम, U 17 मधे समृध्दी शेरकी उप विजेती, चैतन्या गिरडे, U 19 मधे लक्ष्मी कोटकर विजेती, तृप्ती कोटकर, प्रेम सोनुने उपविजेता असे एकूण 5 मुली व 2 मुले विभागीय शालेय कॅरम स्पर्धा भंडारा येथे निवड झालेली आहे.

     विद्यार्थी खेड्या गावातील असो वा शहरातील, विद्यार्थी मधे असलेले गुण शिक्षकांना हेरता आले पाहिजे. तेव्हाच त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव देता येईल . जेव्हा वेळ मिळते तेव्हा सराव करवून घेणे गरजेचे आहे. वेळ मिळत नसतो वेळ काढावे लागते. या वर्षी प्रथमच कॅरम स्पर्धेत सहभाग नोंदवून विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन केले. विद्यार्यानी उत्तम खेळून यश खेचून आणले. पहिल्याच प्रयत्नात विभाग करीता निवड होणे हे खरोखरच अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षक बंधूंना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करता आले पाहिजे.

तेव्हाच विद्यार्थी व शाळेचा विकास साधता येतो.प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री नरेन्द्र कन्नाके सर यांनी आपली भूमिका उत्तमपणे पार पाडली. पाच मुली व 2 मुले या सर्वांचे मुख्याध्यापक श्री. बी.जी. ढाकुणकर सर, सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांचे कडून खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!.दिल्या. शाळेतील सर्व विद्यार्थी व पालकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.