जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांनी मिळविले अभूतपूर्व यश 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .2 सप्टेंबर) :- चंद्रपूर जिल्हा जलतरण असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वरोरा येथील एडब्ल्यूएस स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जलतरण स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. या स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात ब्रेस्ट स्ट्रोक आणि फ्री स्टाईल प्रकारात पियुष पिंपळशेंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

१७ वर्षे वयोगटात ओम कोर्टेकर यांनी ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात द्वितीय क्रमांक आणि फ्री स्टाईल मध्ये तृतीय क्रमांक मिळविला. १४ वर्षे वयोगटात रुद्र घिवे यांनी ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक आणि १०० मीटर प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला.

१२ वर्षे वयोगटात वैभव यादव या चिमुकल्याने बटरफ्लाय आणि बॅक स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक तसेच फ्रीस्टाइल प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. ९ वर्ष वयोगटात कृष्णा काळे या चिमुकल्याने बॅक स्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. प्रथमच आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या सर्व स्पर्धकांना कोच हिमांशु गानफाडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी स्पर्धेकांचे एडब्लूएसच्या संचालक आदींनी अभिनंदन केले.