🔸सरकारच्या फसव्या योजनाचा शिवसेना (उबाठा) वतीने भांडाफोड
✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.5 ऑक्टोबर) :- केंद्र सरकार व राज्य सरकार वतीने सुरू करण्यात आलेल्या योजना फक्त कागदावर, मोठ मोठाले बॅनर आणि टीव्ही चॅनलला जाहिराती देण्या एवढ्याच मर्यादित राहिल्या असून सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या जात नाही. या सर्व योजना फसव्या आहे. असे वक्तव्य शिवसेना ( उबाठा) उपनेते तथा कामगार नेते व माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी शेंबड येथे आयोजित होऊ द्या चर्चा कार्यक्रमात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रमा दरम्यान केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र केंद्र सरकार व राज्य सरकारच्या फसव्या योजनाचा भांडाफोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा, करूया बोलवेड्या हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वरोरा तालुक्यातील सुद्धा शिवसेना उपनेते तथा कामगार नेते व माजी नगरसेवक मनोज जामसुतकर व माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात होऊ द्या चर्चा कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाप्रमुख म्हणेल की, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना फक्त धनाढ्य लोकांसाठी लमलात आण्यात येते. एकीकडे शेतकरी बांधव कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्याचे कर्ज माफ न करता उद्योगपती यांचे कर्ज माफ करते.
भाजप सरकारच्या काळात 2016 मध्ये एनसीएलटी कायदा अस्तित्वात आणून याचा फायदा फक्त मोठ मोठ्या कारखानदार लोकांना देण्यात आला. यामुळे अनेक कारखाने दिवाळखोरीत काढून हजारो लोकांना बेरोजगार करण्यात आले. सरकार गोरगरीब लोकांना फक्त गांजर दाखवून फसव्या योजनांचा प्रचार प्रसार करतात.याचाच भांडाफोड करण्यासाठी शिवसेना वरोरा – भद्रावती विधानसभेतील गावा गावात जाऊन या फसव्या योजनांना भांडाफोड करणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
यावेळी, मुंबई युवासेना समन्वयक अमीत जाधव, उदय ,उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, युवासेना जिल्हा समन्वयक दिनेश यादव, विधानसभा संघटक सुधाकर मिलमीले,तालुका प्रमुख विपीन काकडे,शहर प्रमुख संदीप मेश्राम, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, कंत्राटी कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगणे, बंडु पाटेकर,शेंबड येथील सरपंच बालाजी जिवतोडे, माजी उपसरपंच महादेव जीवतोडे, माजी उपसरपंच प्रदीप मत्ते, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव घागी, प्रकाश कुरेकर, निलेश जीवतोडे, सुरेंद्र जीवतोडे, सुरज घागी, सचिन बोढाले, प्रशांत जोगी, शाखा प्रमुख लोकेश धाबेकर, सचिन आसुटकर, प्रवीण जीवतोडे, उपसरपंच ज्योती मेश्राम, मनीषा मते, शोभा कुरेकर, भावना कूरेकार, आदी शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, युवतीसेना व आदी उपस्थित होते.