जिथे गरज – तिथे ट्रस्ट जनसेवेसाठी सदैव मदतीस  धावणारी एकमेव ट्रस्ट

🔸स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती (दि.23 फेब्रुवारी) :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा कोरोना काळापासून घेतलेले मानवसेवेचे व्रत अविरत सुरु आहे. “एक हात मदतीचा” हे ब्रीदवाक्य घेवून आत्मविश्वास बाळगा, हीच खरी आपली ताकद आहे असा संदेश देत “जिथे गरज, तिथे ट्रस्ट”, या संकल्पनेने ट्रस्ट कार्य करीत आहे. त्यामुळे समाजातील दीन-दुबळे, गरीब-गरजू, पिडीत-शोषित, शेतकरी-शेतमजूर, निराधार-दिव्यांग, महिला, होतकरू विद्यार्थी, गंभीर आजाराचे रुग्ण, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी किंवा मृत, लघुव्यावसाईक, आदींनी ट्रस्टच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर अंतर्गत श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, विदेही सदगुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आदी योजना कार्यान्वित आहेत.

या योजनांच्या माध्यमातून निःशुल्क कोविड केअर सेंटर, भव्य आरोग्य तपासणी शिबिर, रुग्ण उपचारसेवा मदतकार्य, कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक सहकार्य, दिव्यांगांना निःशुल्क सायकल वाटप, विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा, आत्महत्याग्रस्त, गरीब, गरजू शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील व निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, कोरोणाने मृत, आत्महत्याग्रस्त, गरीब, गरजू शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च, ग्रामीण जनतेमधे जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकऱ्यांचे शेतीसंबंधीत साहित्य, जनावरे, आदींचे नुकसान झाल्यास आर्थिक सहकार्य, व्यसन मुक्त गाव अभियान, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, नैसर्गिक आपत्तीमधे मदत व सेवा, लघु व्यावसायिकांना प्रोत्साहनपर मदत, स्वाभिमानी व स्वावलंबी युवक योजना, बचत गट सक्षमीकरण व महिला उत्थान कार्यक्रम, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मृत नागरिकाच्या कुटुंबास आर्थिक सहकार्य आदी लोकोपयोगी कार्य सुरू आहेत. 

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारे सुरू असलेल्या या विविध योजनांपैकी एक योजना श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान आहे. यामधील एक भाग कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक सहकार्य करणे आहे. 

स्थानिक झिंगूजी वार्ड भद्रावती येथील ६२ वर्षीय रहिवाशी माया शंकर नागपुरे ह्या दुर्धर कर्करोगाने पीडित असून आर्थिक परिस्थितीने कमकुवत आहेत. त्यांना उपचाराकरिता नगरसेवक नंदू पढाल यांचा माध्यमातून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टकडे अर्जाद्वारे मागणी केले. रोगाचे गांभीर्य बघता कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी तात्काळ संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्यासोबत संपर्क करून विश्वस्त सुषमाताई शिंदे यांच्यासह रुग्णाला घरी जाऊन उपचाराकरिता आर्थिक सहकार्य केले.

या प्रसंगी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, विश्वस्त सुषमाताई शिंदे, नगरसेवक नंदू पढाल, सामाजिक कार्यकर्ते चंपतराव आस्वले, सामाजिक कार्यकर्ते  पत्रकार दिलीप मांढरे, दिलीप ठेंगे, गौरव नागपुरे उपस्थित होते.ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी रुग्ण माया नागपुरे यांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेकरिता ट्रस्टच्या माध्यमातून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.