जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कार्यवाही करा

🔹शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.11 मे) :- आगामी खरीप हंगामापूर्वीचा रासायनिक खताच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली अशी काही कृषी संचालक यांनी अफवा पसरुन अव्वाच्या -सव्वा दराने खतांची विक्री करित असेल आणि शेतकऱ्यांना लूट-मार करणाऱ्या कृषी संचालकांवर कार्यवाही करण्यात यावे.अशी मागणी उमरे यांनी केली.

खात्याचा भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून शेतमालाच्या उत्पादनात खर्चात वाढ होऊ शेकते.शेतीसाठी रासायनिक खताचा वापर जवळपास अनिवारित झाला आहे.त्यामुळे शेतीच्या उत्पादनात खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बदलतात.त्यात गेल्या काही वर्षात सततची भाव वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे आधीच आर्थिक गणित बिघडत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात खरीप ची पेरणीसाठी एक महिन्यात वेळ असली तरी शेतकरी मे महिन्यात खताची खरेदी करतात.आवश्क असलेल्या खतांची आतापासूनच मागणी होत आहे.

अशातच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाल्याची अफवा पसरून या अफवेचा फायदा घेऊन काही कृषी केंद्र व्यावसायिक शेतकऱ्यांनची लूट करु शेकतात .अशा अव्वाच्या -सव्वा दराने खतांची विक्री करणाऱ्या कृषी संचालकांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास योग्य ती चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.