✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.3 जुलै) :-
महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी यांनी कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक अंतर्गत जामगाव बुजूर्ग येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वृक्षदिंडी, वृक्षारोपण तसेच जनावरांना गळघोटू (हिमोग्रेजिक स्पेक्टीमिया) रोगाविरुद्ध एच .एस . याचे लसीकरण देण्यात आले. सोबतच जनावरांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर ही प्रकाश टाकण्यात आला
यावेळी कार्यक्रमात पशुवैद्य डॉ. निलेश लोखंडे तसेच सहकारी रंजीत कुरेकर तसेच शेतकरी अक्षय ताजने ,ईश्वर आसूटकर ,अमोल मोहाडे ,बावणे विजय तुरणकर इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित कृषी कन्या अंजली शेरकी, निकिता पिंपळकर ,राधा राखडे ,धनश्री राठोड, आकांक्षा रोगे ,मानसी सारवे आणि बाशू पेटकर यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार ,ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रभारी डॉ.रामचंद्र महाजन तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. मुकुंद पातोंड डॉ. सतीश इमडे ,डॉक्टर प्रशांत राखुंडे ,डॉ अश्विनी मानकर व कार्यक्रम समन्वयक डॉ. राहुल तायडे आणि कार्यक्रमासाठी लाभलेले विशेष विषय तज्ञ डॉ.विजय पाटील ,डॉ. प्रदीप अकोटकर, डॉ.अनिल भोगावे ,राजेश रहाटे डॉ. मनोज जोगी सोबत डॉ. गाजरलावर , डॉ. उरकुडे, डॉ पांडुरंग कवठेकर, नितीन गजबे, डॉ स्वप्नील पंचभाई यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.