जबड्या चा कॅन्सर रोखण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळा….डॉ. मंगेश गुलवाडे

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.3 जून) :- 

इंडियन रेडक्रॉस सोसायटी, आय.एम.ए. व चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव व आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध कॅन्सरची माहिती जन समुदायला दिली, तसेच तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाच्या माहिती सोबतच या वर्षीचे ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने तंबाखूच्या जाहिरातीमुळे तरुण मुला-मुलींवर होणाऱ्या आघातामुळे चिंता व्यक्त केली.

डॉ. कल्पना गुलवाडे (माजी सचिव आई. एम. ए.)प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना उष्णतेच्या तीव्र लाटेपासून बचाव करण्यासंबंधीच्या घेण्यात येणाऱ्या उपाय योजनेबद्दल माहिती दिली. डॉ. बी.एच. दाभेरे यांनी तंबाखू सेवन न करण्यासाठीची प्रतिज्ञा जन समाजाकडून वदवून घेतली.

          या कार्यक्रमाच्याप्रसंगी डॉ. राकेश कपुरिया, आय. एम. ए. सचिव डॉ. प्रवीण पंत,डॉ. आशिष बारब्दे, प्रोजेक्ट हेड वैभव गौतम,श्री हफीज यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन महेश मुनरतीवार यांनी केले तर आभार पियुष मेश्राम यांनी मानले.