🔸37 जनावराची सुटका
🔹१६ लाखाचा मुद्देमाल जप्त
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.25 सप्टेंबर) :- राज्यात गोहत्येवर बंदी आहे.याही परिस्थितीत लगतच्या तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोवंश तस्करी होत असल्याची माहिती गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली.त्यांनी आज स्थानिक शिवाजी चौक येथे नाकेबंदी केली असता ट्रक क्र.एमएच १२ एनएक्स २८०९ या १४ चक्का वाहनातून गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याचे आढळून आले.याप्रकरणी आरोपी फारुख नासिर शेख रा.बल्लारपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंद्याना ऊत आला होता.मात्र या धंद्याविरोधात गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी कंबर कसली आणि कार्यवाहीचा सपाटा सुरु केला.अल्पवधीतच अनेक तस्करांना अटक केली.यामुळे तस्करांचे धाबे दानाणले.असे असतानाही अधूनमधून तस्कर डोके वर काढत असतात.
लगतच्या गडचिरोली येथून अवैध गोवंश भरलेले ट्रक गोंडपिपरी मार्गे येत असल्याची माहिती मिळताच नाकाबंदी करीत ट्रक थांबविली आणि चौकशी केली असता ट्रकमध्ये ३७ गोवंशिय जनावरे कोंबून भरल्याचे निदर्शनात आले.यावेळी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून कलम ५,९,११,प्राणी रक्षा अधिनिमय सह कलम ११ आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत याच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे,सहाय्यक फौजदार खुशाल टेकाम,पोलीस अमलदार सचिन मोहरले यांनी केली.