जनावरांच्या चाऱ्यालां लागली आग… आगीत होरपळून जनावराचा मृत्यू

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 एप्रिल) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे आज दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या मांडवाला आग लागली असून या आगीत मांडवा खाली असलेले म्हशीचे पिल्लू यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.  

       चारगाव खुर्द येथील युवा शेतकरी श्री विलास चवले यांच्या शेतात आज अचानक आग लागल्याने या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले. या आगीत तीन म्हशी अंदाजे रक्कम एक लाख पन्नास हजार तसेच त्यांचे तीन पिले अंदाजे रक्कम तीस हजार रु. तसेच जनावरांचा चारा यात गवांडा, कुटार, तनिस , जळून खक झाली यात या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्याला शासन कडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत. 

       उन्हाळ्याची चाहूल लागताच विलास चवले यांनी आपल्या शेतामध्ये जनावराच्या सोई करिता मंडवाची निर्मिती केली होती या मांडवात त्यांच्या कडे असलेले सर्व जनावरे दुपारच्या वेळेस शेतातील मांडवात राहत होते शिवाय मांडवात जनावरांचा चारा देखील होता आज अचानक दुपारच्या वेळेस आग लागल्याने सर्व जळून खाक झाले.

सदर ही आग विद्युत तारांच्या स्पर्शाने शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले . विशेष म्हणजे शेती सोबत जोळ धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या विलास चवले या शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे . सुदैवाने त्यांचे काही जनावरे दूर झाडाच्या खाली बांधून असल्याने बैल जोडी तसेच काही जनावरे सुखरूप वाचले .