जनसुनावणीच्या माध्यमातुन शेतक-याचे वर्ग-2 जमीनीचे प्रश्न मार्गी लागणार….डॉ. अंकुश आगलावे 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क )

 वरोरा(दि.6 सप्टेंबर) :- जनसुनावणीच्या माध्यमातुन शेतक-याचे वर्ग-2 जमीनीचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा, चे डॉ. अंकुश आगलावे यांनी शेतक-यांच्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग -2 मधून वर्ग – 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी आयोजित केलेल्या जनसुनावणी केले.

      कार्यक्रमाचे आयोजन हंसराजजी अहीर, राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मागास आयोग भारत सरकार यांच्या नेतृत्वात दि. 4/9/2024 रोजी कटारिया मंगल कार्यालय, वरोरा येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले होते.

       या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार भद्रावती व वरोरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वरोरा व भद्रावती तालुक्यातील भोगवट वर्ग 2 ची वर्ग 1 मध्ये वर्गीकरण करण्यासाठीची प्रलंबित व नव्याने दाखल केलेली प्रकरणे येत्या आठवडयाभरात निकाली काढावी असे निर्देश यावेळी ंहंसराजजी अहीर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले

      वरोरा व भद्रावती विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतक-यांनी या जनसुनावणीत सहभाग घेवून अर्ज सादर केेले. या जनसुनावणीत भद्रावती तालुक्यातून 200 व वरोरा तालुक्यातून 500 अर्ज दाखल करण्यात आले. तसेच तालुक्यातील 200 शेतक-यांनी सहभाग घेतला. या जनसुनावणीत अनेक शेतक-यांना आपल्या जमीनी रूपांतरीत करण्याची संधी मिळून त्यांचा फायदा होणार असल्याचे डॉ. अंकुश आगलावे यांनी सांगितले.  

        यावेळी डॉ. आगलावे म्हणाले की, हंसराज भैय्या अहीर हे शेतक-यांचे कैवारी असून अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावून जमीनीचा उचित मोबदला मिळवून दिला तथा वेकोलित जमीन संपादीत प्रकल्पग्रस्तांना नौकरीही मिळवून दिले. या कार्यक्रमात वरोरा व भद्रावती तहसिल मधील अनेक गावातून शेतकरी बांधव उपस्थित होते.