जनतेने स्वयं स्फूर्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे….राजू कुडे 

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.16 मे) :- 

भारतात वाढत्या लोकसंख्येसोबतच बोरवेलची संख्या सुद्धा वाढलेली आहे. यामुळे भूमिगत पाणी मोठ्या प्रमाणात उपसा केल्या जात आहे. ज्यामुळे जल संकट वाढत आहे जनतेने स्वयंपूर्ण रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे व आपल्या घराच्या छतावरील अंगणातील थेंबनथेंब पाणी जमिनीमध्ये जाईल अशी व्यवस्था करावी.  

महानगरपालिकेने वारंवार रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याकरता जाहिराती सूचना केलेले आहेत. पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थेने सुद्धा याबद्दल जनजागृती चे कार्यक्रम केलेले आहे परंतु पुरेशा प्रमाणामध्ये अजूनही रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेले नाही ज्यामुळे चंद्रपूरचे तापमान सतत वाढत आहेत. याची झळ आपल्या सर्वांना सोसावी लागत आहे.

 जनतेने स्वतः पाण्याचे महत्व समजून रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे.

 तसेच मोठ्या संख्येने वृक्षारोपण सुद्धा करावे. असे आव्हान आम आदमी पार्टीचे युवा जिल्हध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.