🔸चंदनखेडा येथे ‘ होऊ द्या चर्चा ! ’ अभियानाअंतर्गत जनसंवाद
✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि .9 ऑक्टोबर) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बहाल केला आहे. मतदान हे साधारण दान नाही. मतदानाचे मुल्य आपण जाणले पाहीजे.
लोकशाही राज्यप्रणालीत मतदानाच्या हक्काच्या बळावर प्रत्येक नागरिकांना देशाच्या कारभारात अप्रत्यक्षपणे सहभाग घेता येतो. म्हणून मतदानाचा हक्क बजावतांना कोणता लोकप्रतिनिधी समाजाचा सर्वांगिण विकास अंतकरण : पूर्वक आणि निस्वार्थ वृत्तीने करेल याची जाणीव ठेवून जनतेनी आपल्या न्याय, हक्क व कर्तव्याप्रती नेहमी तत्पर असावे . असे आवाहन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पुर्व विदर्भ महिला संघटिका तथा प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी केले.
तालुक्यातील चंदनखेडा येथील कर्मवीर सभागृहात नुकत्याच आयोजित ‘ होऊ द्या चर्चा ! ’ जनसवांद कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाचा भांडाफोड करतांना प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्रा. शिल्या बोडखे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
याप्रसंगी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वर्तमान परिस्थितीत देशातील लोकशाही प्रणालीला धोका निर्माण झाला आहे. शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. शेत पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही.
सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. यामुळे शेतकरी व युवकांत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. महागाईने उंचाक गाठला आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार वाढत आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण ? आहे. याचा विचार आपण करावा. यापूढे सतत सावध राहूण आपण कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी उपस्थितांना केले.
याप्रसंगी व्यासपिठावर पूर्व विदर्भ महिला संघटिका तथा प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे, युवा सेनेचे प्रा.निलेश बेलखेडे , महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरकर, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, तालुका उपप्रमुख तथा मुधोलीचे सरपंच बंडू पा.न्नावरे,युवती सेना जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर.
विधानसभा संघटक मंगेश भोयर, कंत्राटी कर्मचारी कामगार सेना जिल्हा महासचिव अमोल मेश्राम आणि युवा सेना प्रमुख राहूल मालेकर उपस्थित होते. इतर मान्यवर मंडळींनी सुध्दा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा भांडाफोड करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी चंदनखेडा परिसरातील बंधू -भगिनी फार मोठया संख्येत उपस्थित होत्या.